MUMBAI | ओबीसींच्या आरक्षणासाठी सत्ता हस्तगत करण्यासाठी पक्ष स्थापन करण्यात आलाय - प्रकाश अण्णा शेंडगे
- मराठा आरक्षणाचा वादळ महाराष्ट्रावर घोंघावत आहे
- प्रस्थापितांना आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजावर घाला घालण्याचं पाप करण्यात आलं
- सत्तेचा वापर करुन ओबीसी समाजाच्या आरक्षणासाचे तीन तेरा वाजवले आहेत
- सत्ता हस्तगत करण्यासाठी राज्यातील ओबीसी भटके समाजाने ठरवलं. त्यानंतर आता पक्ष स्थापन करण्यात आला
- ओबीसींच्या आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी पार्टीची स्थापना
- गेले दोन महिने अनेक बैठका झाल्या, सविस्तर चर्चा झाली आता पक्षाचं नाव ठरवलं आहे
- ओबीसी बहुजन पार्टी असे आम्ही ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या पक्षाचे नाव आहे
- पक्षाचा झेंडा हा पिवळ्या रंगाचा असणार आहे
- तुतारी वाजवणारा माणूस, बॅटरी आणि ऑटोरिक्षा या तीन चिन्हांचे पर्याय देण्यात आले आहेत
- आमची पक्षघटना धर्मनिरपेक्ष अशा स्वरुपाची असेल
ऑन निवडणुका
- भटक्या विमुक्त यांना न्याय देणं हे पहिलं उद्दिष्ट आहे
- तिकिटासाठी ज्यांना खेपा घालाव्या लागत होत्या त्यांना आता खेपा घालाव्या लागणार नाहीत
- 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदार संघात ओबीसी, भटके, विमुक्त उमेदवार दिसतील
ऑन भुजबळ यांच्याशी बोलणं झालं का?
- हा पक्ष स्थापन करत असताना आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतलाय
- जेव्हा केव्हा ते बाहेर पडतील तेव्हा तेच आमचे नेते असतील हे निश्चित
- आज सत्तेत ओबीसी बाजूने लढणारे एकमेव नेते ते आहेत
- जोवर सरकार आहे तोवर सरकारमध्ये राहून त्यांनी संघर्ष करावा आणि आपली बाजू मांडावी
- लोकसभेच्या 48 जागा लढवणार
- 10 ते 12 जागा फायनल
ऑन जरांगे तब्येत
- मी जरांगे साहेबांना आवाहन करेन की, तुम्ही उपोषण थांबवा ते समाजासाठी आणि तुमच्यासाठी हिताचं आहे
- असं पटकन आरक्षण मिळत नाही
- आमचा धनगर समाज दोन पिढ्या लढतो
- सरकार टिकणार आरक्षण देणार आहे
- त्यांना वेळ द्या
यवतमाळ
नांदेड
हिंगोली
जालना
परभणी
माढा
बारामती
बीड
सांगली
हातकणंगले
या लोकसभा मतदारसंघात आमचे उमेदवार निश्चित झाले आहेत.
BYTE - प्रकाश अण्णा शेंडगे, ओबीसी बहुजन पार्टी अध्यक्ष
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 14, 2024
Published:Feb 14, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Mumbai