AURANGABAD | सिल्लोड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक;बाजारपेठा कडकडीत बंद
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालवत असल्याने सकल मराठा समाजाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यालाच पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाज वतीने सिल्लोड बंद ठेवण्यात आले आहे. याच अनुषंगाने आज सर्व बाजार पेठा बंद आहेत. सिल्लोड शहरासह परिसरातील सोयगाव ,कन्नड, फुलंब्री, खुलताबाद तालुक्यात ही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. सरकारने लवकरात लवकर अधिवेशन बोलवावे व आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा समाज बांधवांनी केली आहे.
BYTE- डॉ. शेखर दोड, मराठा बांधव
BYTE- रमेश साळवे, मराठा बांधव
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 14, 2024
Published:Feb 14, 2024
Type:Standard
Category:News Updates
Region:AURANGABAD