PANDHARPUR | देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे काम राज्यात गृहमंत्री म्हणून कुणी केले नाही- गोपीचंद पडळकर
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करत आहेत. तशा पद्धतीने गुहमंत्री म्हणून काम आजपर्यंत महाराष्ट्रात कुणी केले नाही. गृहमंत्री फडणवीस काय क्षमतेने काम करत आहेत. हे राज्यातील जनता पाहत आहे. १०० कोटी गोळा करणारा गुहमंत्री तुरुंगात गेला होता. या घटनेला फार वर्षे झाली नाहीत.आणि आज तीच लोक पुढे येत मोठेपणाचा आव आणून बोलत आहेत. त्यामुळे आपले गृहमंत्री फडणवीस अधिक सक्षमपणे काम करतात. पुणे येथे २५० गुंड्यांना एका रांगेत पोलिसांनी उभा केले हे या सरकारचे आणि फडणवीस यांचेच काम आहे.
राज्यात गोळीबाराच्या घटना घडण्यानंतर विरोधकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे येतोय. गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. याबाबत आता आमदार पडळकर यांनी फडणवीस हेच सक्षम गृहमंत्री असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.
BYTE : आमदार गोपीचंद पडळकर
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Pandharpur