KALYAN | कल्याण पूर्वेत महापालिकेतर्फे शासन आपल्या दारी अर्ज नोंदणी शिबिराचे आयोजन
नागरिकांना केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे शासन आपल्या दारी अर्ज नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज कल्याण पूर्वेतील अडीवली ढोकली मैदान येथे हे भव्य दिव्य शासकीय योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी केडीएमसी सहाय्यक आयुक्त हेमा मुंबईकर यांनी पुढाकार घेतला. अडीवली ढोकली इथल्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. या शिबिराच्या मार्फत उत्पन्न दाखला, डोमेनसाईल दाखला, जननी सुरक्षा योजना, आयुष्यमान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना, आधार कार्ड सेवा, प्रधानमंत्री आवास योजना, स्वानिधी योजना, मातृत्व योजना, रहिवासी स्थानिक वास्तव्याचा दाखला, बांधकाम कामगार योजना, किसन सन्मान योजना आदी योजनांसाठी नागरिक नोंदणी करु शकतात.
BYTE- लक्ष्मण पाटील, केडीएमसी मुख्य लेखापरीक्षक
BYTE- लाभार्थी
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Kalyan